चित्रा न्युज प्रतिनिधी
मोर्शी - दरवर्षी 19 जून हा दिवस जगभरात जागतिक सिकलसेल जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 2008 मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला, सिकलसेल हा एक गंभीर अनुवंशिक आजार असून रक्ताशी संबंधित आजार आहे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वर्ष 2026 ची अधिकृत जागतिक थीम "सिकलसेल माहिती वाढवा ,कलंक दूर करा, काळजी सुधारा"
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे हा दिवस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी सिकलसेल रुग्णांची इतर रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच डॉ .प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक यांनी रुग्णांना सिकलसेल विषयी माहिती सांगून दोन्ही जोडीदार सिकलसेल वाहक असल्यास मुलांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका शंभर टक्के असतो, तसेच लग्न पूर्व कुंडली ऐवजी रक्त कुंडली तपासने आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे या त्रिसूतीचा अवलंब करून आपण या आजारावर मात करू शकतो असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पाटील सिकलसेल वैज्ञानिक अधिकारी यांनी केले.
यावेळी रुग्णालयातील कर्मचारी, श्री विनय शेलुरे,प्रकाश मंगडे, प्रशांत बेहरे, अमोल झाडे, आशिष नेरकर, सुजित वानखडे, नंदू थोरात हजर होते


0 टिप्पण्या