Ticker

6/recent/ticker-posts

अनुभव आणि जिद्दीच्या बळावर साहिल लोणारे यांचा ITI करून यशस्वी प्रवास

 
 रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: मूळचा राहणार मु पो पहेला गाव, ता. जि. भंडारा येथील साहिल दिलीप लोणारे याने अथक परिश्रम आणि संगणक क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण व दांडग्या अनुभवाच्या जोरावर भंडारा जिल्ह्यात आत्मनिर्भरतेचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. साहिलने २०१७ ते २०१९ या काळात 'एमएस-सीआयटी कॉर्डीनेटर (शिक्षक)' म्हणून काम केले. त्यानंतर २०१९ ते २०२२ या काळात घनश्याम हारगुळे यांच्या इंटरनेट कॅफेमध्ये प्रत्यक्ष कामाचे आणि व्यवसायाचे मोलाचे धडे गिरवले. पण त्याच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती जेव्हा त्याने शासकीय ITI साकोली जिल्हा भंडारा येथे COPA (Computer Operator & Programming Assistant) या Trade व्यवसायाला ला सत्र २०२२ – २०२३ मध्ये प्रवेश घेतला. हा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याचे व्यवसाय निदेशक एस. आर. आठवले यांनी त्याला कॉम्प्युटरचे तांत्रिक ज्ञान तसेच दैनंदिन कामात येणारे सर्व बारीक कन्सेप्ट्स बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकवले. त्याचा पूर्वानुभव व ITI मध्ये घेतलेल्या तांत्रिक प्रशिक्षणाच्या जोरावर १२ जून २०२३ रोजी पंचायत समितीमार्फत साहिलची 'ग्रामपंचायत कार्यालय, अर्जुनी (पु.)'  येथे संगणक परिचालक म्हणून अधिकृत निवड झाली आणि २०२३ पासूनच त्याने स्वतःचे 'साहिल सीएससी सेतू आणि इंटरनेट कॅफे' देखील यशस्वीपणे सुरू केले. एवढ्यावरच न थांबता सोबतच त्याने BSW ची पदवी सुद्धा मिळवली. आज साहिल अर्जुनी (पु.) येथे संगणक परिचालक म्हणून सेवा देत असून, आपल्या केंद्राच्या माध्यमातून गावातील लोकांना सर्व प्रकारच्या शासकीय योजना समजावून सांगतो. तसेच शेतकरी योजना, बँक संबंधित कामे आणि निमशासकीय नोकरी संदर्भातील फॉर्म अचूक भरून देत आहे. विशेष म्हणजे, आज त्याच्या ऑफिसमध्ये २ ग्रामीण तरुण प्रशिक्षणार्थी म्हणून काम शिकत आहेत. स्वतः संघर्ष करून उभा राहिलेला साहिल आज इतर तरुणांना आत्मनिर्भर बनवत असल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपूर्ण संघर्षात त्याला त्याची आई मीरा दिलीप लोणारे यांची खंबीर साथ लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या