Ticker

6/recent/ticker-posts

सेवेचा गौरव! सेवानिवृत्त PSI भास्कर कुंदावर यांचा चंद्रपूर पोलीस सभागृहात भव्य सत्कार

पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव; शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन अभिवादन

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : सेवेतून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक  भास्करजी कुंदावर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व सन्माननीय सेवानिवृत्ती निमित्त मंगळवारी दि. 1 जुलै 2026 रोजी चंद्रपूर पोलीस सभागृह येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन जय जिवाजी क्रांती सेना, श्री विठ्ठल रुक्मिणी श्री संत नगाजी महाराज मंदिर समिती, बल्लारपूर नाभिक समाज तसेच समाजातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आले होते. संघटनेच्या वतीने  कुंदावर साहेब यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष गणेश वनकर, संघटक प्रमुख शंकर चौधरी, उपाध्यक्ष मिथुन हनुमंते, कोषाध्यक्ष अमोल राजुरकर, सल्लागार शिवशंकर दर्वे आणि पुरुषोत्तम नागतुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी कुंदावर साहेब यांच्या पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. त्यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा व समाजसेवेचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
___________________________________

👮‍♂️ सेवानिवृत्त PSI भास्कर कुंदावर यांचा भव्य सत्कार!

चंद्रपूर पोलीस सभागृहात वाढदिवस व सेवानिवृत्ती निमित्त सन्मान. जय जिवाजी क्रांती सेना, नगाजी महाराज मंदिर समिती, नाभिक समाज यांच्याकडून शाल-श्रीफळ-सन्मानचिन्ह देऊन गौरव. पोलीस सेवेचे कौतुक, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या