Ticker

6/recent/ticker-posts

विरूर पोलिस स्टेशन समोरच सुगंधित तंबाखू विक्री! तक्रार देऊनही कारवाई शून्य

राजुरा येथून पार्सलने येतोय अवैध साठा; नावासहित तक्रार असतानाही पोलीस गप्प


बसस्टॉप-किराणा दुकानात सर्रास विक्री; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी


 राजेश येसेकर चित्रा न्युज 

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे पोलिस स्टेशन समोरच सुगंधित तंबाखू-गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. मागील काळात विरूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्टॉप परिसरातील एका किराणा दुकानात सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या दुकानदारासह तंबाखू तस्करांची नावासहित तक्रार विरूर पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, बिट अमलदारांनी आजपर्यंत कारवाई केली नाही. सध्या देखील तेथे विक्री सुरूच आहे.
  
सदर माहितीनुसार, राजुरा येथील मोठे किराणा व्यावसायिक 'ईगल' सारखी अवैध सुगंधित तंबाखू किराणा मालाच्या सामानात लपवून पार्सल करीत आहेत. विरूर येथे तो पोहोचत आहे. 

तक्रारकर्त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले, "पोलिस स्टेशन समोरच विक्री होते, नावासहित तक्रार दिली तरी कारवाई शून्य. पोलीस प्रशासन झोपले आहे का?" त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की तात्काळ छापा टाकून अवैध सुगंधित तंबाखूची विक्री बंद करण्यात यावी.
______________________________________

🚭 विरूर पोलिस स्टेशन समोरच गुटखा विक्री!

राजुरा तालुका विरूर येथे पोलिस स्टेशन समोर बसस्टॉपच्या किराणा दुकानात अवैध सुगंधित तंबाखू 'ईगल' ची सर्रास विक्री. राजुरा येथून पार्सलने येतोय साठा. नावासहित तक्रार देऊनही विरूर पोलिसांची कारवाई शून्य. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारकर्त्यांची कारवाईची मागणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या