वरोरा प्रतिनिधी ✍️ होमराज घुमे
वरोरा : वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. या कारवाईत 5 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून एकूण 7,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार, 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते 3.45 वाजेदरम्यान मौजा आठवडी बाजार, शिवमंदिरालगत, यात्रा वॉर्ड येथे छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता काही इसम 52 पत्त्यांवर पैशांचा हार-जीतचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले, तर 5 जणांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून 6,310 रुपये रोख रक्कम आणि 52 पत्ते जप्त करण्यात आले. तसेच संशयितांच्या अंगझडतीतून अनुक्रमे 180, 330, 120, 310 आणि 290 रुपये अशी एकूण 1,230 रुपये रोख रक्कम एकूण जप्त मुद्देमाल : 7,440 रुपये मिळाली.
या प्रकरणी खालील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे: धनखील शेषराव नगराळे - वय 27, कुणाल नारायण दायरे - वय 25, भिमा रामदास दांडेकर - वय 42, सागर वाल्मीक पाझारे - वय 32 आणि दिलीप रामचंद्र काळे - वय 42 यांच्यावर गुन्ह दाखल केला आहे.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 मधील कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एफआयआर क्रमांक: 0907/2026 वेळ : 19 ऑगस्ट 2026, सायंकाळी 5.46 वाजता
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 टिप्पण्या