Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगांवात स्वातंत्र्याचा जल्लोष – जय माँ काली ब्रिक्स कंपनी व पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीत 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगांव:-  देशभरात 80 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा होत असतांना, गोरेगांव तालुक्यातील जय माँ काली ब्रिक्स कंपनी आणि पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे देखील हा सोहळा भव्यदिव्य पार पडला.
सकाळी 8.00 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिसर देशभक्तीपर गाणी, घोषवाक्ये आणि राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजला होता. 
मजदूर युनियन लीडर माननीय सुरेशजी मळकाम यांच्या अध्यक्षेत *प्रमुख ध्वजारोहक माननीय सुरेंद्रजी बिसेन,* माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगांव तसेच जय माँ काली ब्रिक्स कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक यांच्या हस्ते झेंडा पुजन करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी "भारत माता की जय" च्या घोषणा देत देशभक्तीचा जल्लोष केला.
आपल्या भाषणात माननीय सुरेंद्रजी बिसेन यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करतांना सांगितले,
"1947 पूर्वी आपण अंग्रेजांच्या गुलामीत होतो. त्या दिवसांचा आम्हाला अनुभव नाही, पण आमच्या वडीलधाऱ्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन भारत मातेला स्वतंत्र केले. आज आपण त्या त्यागाची आठवण ठेवून देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे."
त्यांनी पुढे नमूद केले की,
"स्वातंत्र्य दिन हा फक्त आनंदाचा सोहळा नाही तर जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि उद्योग-शेतीच्या विकासातूनच आपला देश अधिक बळकट होईल."
जय माँ काली ब्रिक्स कंपनीचे सर्व कर्मचारी तसेच पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सदस्य व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते, घोषवाक्ये करण्यात आले.
सोहळ्याचा समारोप "भारत माता की जय" आणि "जय हिंद" च्या घोषणांनी झाला. उपस्थितांनी राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या