Ticker

6/recent/ticker-posts

शिंदे गटाला मोठा धक्का ! वरोरा-भद्रावतीत शेकडो युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश


प्रतिनिधी✍️ राजेश येसेकर

 चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव आमदार वरूनजी सरदेसाई तसेच शिवसेना सचिव सुरजभैय्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनात GEN-Z युवकांचा हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या सोहळ्याचे नेतृत्व शिवसेना जिल्हा संघटक तथा बांधकाम सभापती मनीष मुरली जेठाणी यांनी केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असून, शिंदे गटाचे युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि उपतालुका प्रमुख रूपेश चिंचोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी युवासेना सहसचिव तथा युवती जिल्हा अधिकारी सौ. रोहिणीताई विक्रांत पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीपजी रियाल (पटेल), महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. भावनाताई मिथुन खोब्रागडे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेशजी नायडू, माजी तालुका प्रमुख तथा स्वीकृत सदस्य न.प. भद्रावती नंदूभाऊ पढाल, माजी तालुका प्रमुख तथा सरपंच मोहबाळा  नंदलाल टेमुर्डे,कामगार नेते घनश्याम आसवले, प्रमोद वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेना प्रेमी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. युवकांच्या या उत्स्फूर्त प्रवेशामुळे वरोरा-भद्रावती परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या