प्रतिनिधि ✍️ राजेश येसेकर
चंद्रपूर :-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ऊर्जाग्राम गेटसमोर झालेल्या भीषण अपघात एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दुचाकीवरील इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH-34-CF-8510 वरून तिघे जण प्रवास करत होते. ऊर्जाग्राम कॉलनीतून दुचाकी NH-930 महामार्गावर प्रवेश करत असतानाच भरधाव एसटी बस क्रमांक MH-14-MH-5322 ने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवर सर्वात मागे बसलेला बादल सुनील भोयर वय १७, रा. गोरजा, ता. भद्रावती हा रस्त्यावर फेकला गेला. तो थेट एसटी बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात दुचाकी चालक साहिल मोरेश्वर गोरे वय २१, रा. चीरादेवी आणि मागे बसलेला तनुज सुभाष ढवस वय १८, रा. घोट निंबाळा हे दोघे डिव्हायडरवर पडल्याने किरकोळ जखमी झाले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खासगी वाहनाने भद्रावतीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
अपघाताची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे, API धोंगडे, ASI नायडू यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
टीप: महामार्गावरून जाताना आणि कॉलनीतून मुख्य रस्त्यावर प्रवेश करताना नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


0 टिप्पण्या