Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यातील ग्रामसेवकांचा ग्रामसभा घेण्यावर बहिष्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.) :-जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभेत झालेल्या दबावामुळे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई १३६ तसेच ग्रामपंचायत ग्रामसंघ युनियनने दि.19 ऑगस्ट 2026 पासून राज्यभरातील सर्व ग्रामसभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.युनियनने दिलेल्या माहितीनुसार, काल जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरवे येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांना ग्रामसभेत काही लोकांनी दबाव टाकला. यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत युनियनने आज मंत्रालयात निवेदन दिले आहे. तसेच दि.19 ऑगस्ट 2026 पासून राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे असा निर्णय घेण्यात आला आहे.
*लाखनी तालुक्यातही बहिष्कार*
युनियनच्या आदेशानुसार लाखनी तालुक्यातील कोणताही ग्रामपंचायत अधिकारी यापुढे ग्रामसभेचे आयोजन किंवा नियोजन करणार नाही. युनियन डी.एन.ई १३६ तालुकाध्यक्ष राजेश धवळे तसेच ग्रामपंचायत ग्रामसंघ युनियनचे तालुकाध्यक्ष युवराज तलमले यांनी सांगितले.युनियनने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील. यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या