चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी सनराईज इंग्लिश स्कूल ( मुस्लिम लाइब्रेरी जवळ) मध्ये सकाळी ७.३० वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्ण,देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये श्री. नंदकिशोर झंझाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मोहम्मद सईद शेख व राजेश झंझाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी शाळेच्या संचालिका शमा परवीन खान,आम्रपाली मेश्राम, नंदा भिवगडे,शाहीन खान, शिल्पा कुंडले,नाझिया खान, पुष्पा कोसरे, माधुरी वैरागडे, शारदा चौधरी,नाझिया शेख आदी शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
पावसाची रिमझिम सुरू असतानाही चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखं होता. पावसातही विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कार्यक्रम.
पावसाची रिमझिम सुरू असतानाही चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांनी पिटी, लेझीम, समूहगान, भाषणे आदी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.


0 टिप्पण्या