चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी किल्ले अंबागड येथे बा रायगड परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्वच्छता व संवर्धन मोहीम उत्साहात पार पडली._
_मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली, तसेच किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना स्वच्छता व शिस्तीबाबत आवाहन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गर्दीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठीही बा रायगड परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले._
_किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी सर्व सदस्यांनी मनापासून श्रमदान केले._
या मोहिमेत सहभागी होऊन आपला वेळ, श्रम आणि सहकार्य देणाऱ्या सर्व शिवप्रेमी व दुर्गप्रेमी बांधवांचे मनःपूर्वक आभार प्रदर्शित करण्यात आले.
गडकिल्ले आपला अभिमान आहेत… त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे!
प्रेषक:श्रीधर वडे(बा रायगड परिवार


0 टिप्पण्या