Ticker

6/recent/ticker-posts

दसरा मैदान येथे आयोजित "महा- वॉकेथान" दरम्यान ग्रीन हेरिटेज च्या "कॅच दी रेन"

अभियान बॅनरचे मान्यवर पाहुणे हस्ते उद्घाटन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व जलसंधारणाचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त राज्यभरात जलसंधारण दिन साजरा केला जातो. या औचित्याने 21ऑगस्ट रोजी भंडारा येथील दसरा मैदान येथे जिल्हा मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने *महा वॉकेथान:  वॉक फॉर वॉटर*2026 या उपक्रमांचे सकाळी 7.00 वा.यशस्वी आयोजन करण्यात आले.या उपक्रमात ग्रीन हेरिटेज सामाजिक,पर्यावरण व जल संरक्षण संस्था भंडारा ने ही सहभाग नोंदविला,या प्रसंगी  मा.पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांनी नुकतेच "*कैच दी रेन ,वॉटर-हार्वेस्टिंग,जल समृद्धी अभियान" संपूर्ण  देशभर राबविण्याचे आवाहन केले होते.त्या अनुषंगाने ग्रीन हेरिटेज संस्थेच्या वतीने भंडारा जिल्ह्यात हे अभियान शहर व ग्रामीण क्षेत्रात राबविण्याचे उद्देशाने उपक्रम सुरू करण्यात आले असून संस्थेच्या च्या माध्यमातून या प्रसंगी आव्हान करणारे बॅनरचे उद्घाटन भंडारा/ पौनी वि.स.चे आमदार मा.श्री नरेंद्र जी भोंडेकर,तुमसर /मोहाडी क्षेत्राचे आमदार मा.श्री राजू कारेमोरे,नगराध्यक्ष मा.श्रीमती 
मधुरा मदनकर,यांचे हस्ते करण्यात आले,या प्रसंगी नगरसेविका श्रीमती जयश्री बोरकर,जि.प. सदस्य श्रीमती स्वाती वाघाये,जल संधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री महेश सेलूकर,श्री पूनम गडकरी, ग्रीन हेरिटेजचे संस्थापक  मोहम्मद सईद शेख,सौ.चंदा मुरकुटे,अतुल वर्मा,लियाकत खान,डॉ.मुबारक कुरैशी,दिलीप गायधनी,प्रकाश मुरकुटे,डॉ.अनिता महाजन,नंदा तिडके,योग भारतीचे अध्यक्ष श्री शाम कुकडे,चिंधुजी बुधे,अनिल शेंडे,पुरुषोत्तम समरीत,लता मते, चंद्रशेखर डोळस,धनराज साठवणे,देशमुख, हातझाडे,प्राची ई.उपस्थित होते. 
         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या