Ticker

6/recent/ticker-posts

गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय, भद्रावती व महाकाली निवासी मतिमंद मुला मुलींची कर्मशाळा, भद्रावती येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

भद्रावती : अभिनव आदिवासी शारीरिक व शिक्षण मंडळ द्वारा संचालित गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय  व महाकाली निवासी मतिमंद मुला मुलींची कर्मशाळा भद्रावती, येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी  नरेंद्र पढाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले.
या कार्यक्रमास अभिनव आदिवासी शारीरिक व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  सुरेश पाचपोर, नगरसेवक  नरेंद्र पढाल, संजय पारधी, सरताज शेख यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या परिसरात तिरंग्याच्या रंगांनी सजलेले उत्साही व देशभक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या