Ticker

6/recent/ticker-posts

असली पोलिसांसमोर नकली पोलिसांचे आव्हान

          पोलीस हे आव्हान स्वीकारतील काय ?

साकोली:- रवि भोंगाने

अनेक हिंदी मराठी चित्रपटात असली आणि नकली पोलिसांच्या ३ तासाचा खेळ आपण अनेकदा आणि अनेकांनी बघितलेला आहे. मात्र हाच खेळ जेव्हा वास्तवात बघायला मिळतो तेव्हा मात्र तो चित्रपट न राहता चिंताजनक खेळ म्हणतो. असाच खेळ काही दिवसापूर्वी साकोलीत बघायला मिळालेला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यानी एका नागरिकाच्या गळ्यातील आणि हातातील दागिने लंपास करून दुचाकी वाहनावरून पोबारा केला. एकीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर आणि तेही सकाळी ११:३० वाजता ही घटना झाल्याने आता मात्र नकली पोलिसांना पकडण्याचे आव्हान साकोली पोलिसांसमोर जिकरीचे झाले आहे. तर दुसरीकडे  पोलिसांसमोर या प्रकरणाचा छळा लावण्याची मागणी फिर्यादी गुलाब कापगते यांच्याबरोबरच या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास नेहमीची रहदारी असतांनासुद्धा ही घटना घडल्याने नागरिकांबरोबर महिला वर्गाला असुरक्षित वाटू लागलेले आहे. या रस्त्यावर अशी कोणत्याही प्रकारची घटना अपेक्षित नसतांना अशा घडामोडी घडाव्यात याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काही वर्षांपूर्वी एकोडी फाटा ते तलाव वार्ड असा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याला दोन्ही बाजूने झाडे असल्याने सकाळच्या मॉर्निंग वॉक करिता नागरिक या रस्त्याचा वापर करतात. जाण्यायेण्या करिता हा रस्ता शॉर्टकट असल्याने सकाळपासून ते रात्रीपर्यंत या रस्त्यावर वर्दळ असते. असे असतांना नकली पोलिसांनी असली पोलिसांना चक्रावून टाकले.
पेट्रोल पंपावर जात असलेल्या दुचाकी स्वाराला पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लुटले. सदर प्रकार साकोली येथे १८ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान साकोली येथे तलावपाळ रस्त्यावर घडला. काही दिवसा अगोदर खरबी नाका परिसरात सुद्धा महामार्गावर अशाच प्रकारची घटना घडलेली होती. शासकीय अधिकारी असल्याचे सांगून सोन्याचे दागिने लुटण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी साकोली येथील गुलाब कापगते हे मोटरसायकल क्रमांक एम. एच. ४९ / बी. एफ. २७७२  या दुचाकी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते.  तलाव वार्डकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर हेल्मेट घातलेल्या दोन भामट्यांनी त्यांना थांबवून पोलीस असल्याचे सांगितले. या परिसरात चोरांची भीती आहे त्यामुळे दागिने काढून ठेवा. सोन्याचा गोफ आणि अंगठी काढण्यास सांगून हातचे नकली ऐवज कागदात बांधून त्यांच्याकडे सोपविले. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच साकोली पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. 
----------------------------------------------

तलाव वॉर्ड ते एकोडी फाटा ( तलाव पाळ ) हा मार्ग अत्यंत रहदारीचा आहे. त्यात ११ ते १२ च्या दरम्यान दुपारी लुटमारीची घटना घडणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. परिसरातील नागरिकांना काळजीत टाकणारी आहे. या रस्त्यावर पुरुष नागरिकांसह महिला वर्गसुद्धा जा-ये करीत असतात. सदर घटना पुरुष नागरिकासोबत घडली तरी महिलांमध्ये दहशत पसविणारी आहे. त्यामुळे या घटनेचा तपास लागणे आवश्यक आहे. पोलीस विभाग या घटनेच्या तपास त्वरित लावून आरोपींना लवकरात लवकर अटक करतील अशी आशा करू या. तथा या घटनेच्या निमित्ताने का होईना महिला वर्ग यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

स्मिता सिडाम. 
नगरसेवक साकोली,  
प्रभाग १०.
-----------------------------------------------

या रस्त्याला लागून तलाव वॉर्ड, गणेश वॉर्ड आणि सिव्हिल वार्डातील नागरिकांची वसाहत आहे. या रस्त्यावर अशा प्रकारची घटना घडणे खेदनजनक आहे. सकाळच्यावेळी पुरुषवर्ग कामाच्या निमित्ताने बाहेर पडतो. बहुतांश महिला वर्ग घरी असतात. अशावेळी भामटे वॉर्ड गाठून महिलांची सुद्धा फसवणूक करू शकतात. त्यामुळे या वार्डातील घरी राहणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी नागरिकांनी तर घ्यावीच पण पोलीस विभागाने सुद्धा अशा घटना घडणार नाहीत या  करिता स्वतंत्र यंत्रणा राबवावी.

सपन कापगते.
नगरसेवक साकोली
प्रभाग क्र. १०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या