चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे सद्भावना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयातील समान संधी केंद्राच्या (Equal Opportunity Centre) सहकार्याने आयोजित करण्यात आला. दरवर्षी २० ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा समभावना दिन हा भारतीय समाजातील सर्व घटकांमध्ये शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी समर्पित दिवस आहे. हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान आणि भारताचे सहावे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. विविधतेत एकता, सद्भावना आणि परस्पर सहकार्य यांच्या माध्यमातून प्रगत व सर्वसमावेशक राष्ट्राची निर्मिती करता येते असा त्यांचा ठाम विश्वास होता. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आतिश शहारे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रूपेंद्र मोटघरे, संचालन प्रा. सचिन गजभिये तर आभार प्रदर्शन प्रा. खुशबू राहंगडाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी रवि लांजेवर, मयुरी साठवणे यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या