चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-काही वर्षातच नव्याने फिनिक्स भरारी घेणारी गणेश वॉर्ड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक १. या शाळेत शासन नियमानुसार नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिलीप झोडे तर उपाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सचिन घोनमोडे यांच्या सुविद्य पत्नी काजल घोनमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सध्या या शाळेने शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला लौकीकास्पद उंचीवर नेलेले आहे. त्यामुळे शाळा तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे. नवीन शाळा व्यवस्थापन समिती मागील वारसा पुढे नेऊन या शाळेच्या योगदानात भर टाकतील अशी अपेक्षा समस्त पालकांनी केलेली आहे. निवड करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये खुशाल वरकडे, नीलम राऊत, पवन कोसरे, डीलेश्वरी बोरकर, पुण्यवंता पुस्तोडे, ओंकार कापगते, विकास गहाणे, नरेश लांजेवार, अनिता संग्रामे, जयश्री सोनवणे, पल्लवी भैसारे, सपन कापगते, शिक्षक सदस्य म्हणून श्रद्धा गवळी (औटी ),आनंदराव गायकवाड, आरती कापगते आणि सचिव म्हणून मुख्याध्यापक सेवकराम हटवार यांचा समावेश आहे. नव्याने निवड झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे स्थानिक शाळेतील शिक्षक-शिक्षिका वृंद ज्ञानेश्वर माहुरे, तुळशीदास पटले, चेतन बोरकर, शालिनी राऊत, सुनीता गहाणे यांनी अभिनंदन केलेले आहे.


0 टिप्पण्या