Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस-विद्यार्थी संवाद',मुलींनी सोशल मीडिया विचारपुर्वक हाताळावे:-पोउपनी.प्रवीण हालसे

'
चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:-पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांची संकल्पना आणि डीवायएसपी अरवींद रायबोलेंचे नियोजन असलेला 'पोलिस-विद्यार्थी संवाद' हा स्तूत्य उपक्रम सबंध जिल्ह्यात राबविला जात असून या उपक्रमाला जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन एरियात असलेल्या शाळा,काॅलेज मध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत असून याचाच एक भाग म्हणुन उदगीर तालुक्यातील वाढवणा बू.येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात 'पोलिस-विद्यार्थी' संवाद हा उपक्रम पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात १८ रोजी संपन्न झाला.यावेळी म.पो.प्रणाली गायकवाड सह शिक्षक आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
सध्या समाजात चिञ-विचिञ घटना घडत असून महिला व मुलींनी सोशल मीडिया हाताळण्यासह भविष्याविषयी योग्य ती काळजी घ्यावी.तसेच प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष कुणी ञास देत असेलतर तात्काळ निडरपणे जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.तसेच ११२ या आपत्कालीन नंबरवर काॅल करावा.या काॅलची ताबडतोब दखल घेतली जाते.तेंव्हा मुलींनी सोशल मीडिया हॅंडल करताना लक्षपुर्वक हॅंडल करावे, असे मार्गदर्शन करतेवेळी प्रवीण हालसे पोलिस उपनिरीक्षक यांनी आवाहन केले.
यावेळी संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या