चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड -नांदेड ची मुंबई होणारं हे नक्की,भर दिवसा हत्या होत आहेत आठ ते दहा दिवसांत पाच मर्डर झाले गाॅंग वार होतं आहे त परवाची एक बाब आहे धनेगाव ते दुध डेअरी जवळ धनेगावकर पेट्रोल पंपावर भर दिवसा खुन करण्यात आला हा गाॅंग वारचा प्रकार होता सिडको भागात एक हत्या झाली आणि एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुद्वारा परिसरात पंजाब चे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्या वर हल्ला झाला,एवढी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असून म्हणजे भर वर्दळीच्या ठिकाणी जर असे हमले, हत्या होत असतील तर जनता विश्वास ठेवणार कोणावर काल परवा ची बाब आहे हाॅसपिटल मधै घुसून पोलिसा समक्ष चाकुने भोसकून हत्या करत असताना पोलीस त्या इसमाच्या जवळचं ऊभे होते,तरी त्यांनी त्या हात्याराला रोखण्याचा प्रयत्न ही केला नुसते बघत राहिले हे असं जर घडत असलं तर जनता भरोसा कोणावर करणारं आणि त्या गुंडांना आणखी बळ मिळतं आहे,हेकी वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात जरी कोणाची हत्या होत असेल कोणतेही लोक त्यांना आडवू शकतं नाही त, कारणं ज्याची त्याला जिवाची भिती वाटते जो सोडविण्यासाठी प्रयत्न केला त्याचाच मुडदा पडतो बर्याच अशा घटना झालेल्या आहेत पोलिस स्टेशन च्या आसपास खुन,होत असतात परंतु पोलीस कशा साठी आहेत,जनतेची सुरक्षा करण्यासाठी का हत्याराला सपोर्ट करण्यासाठी हाच प्रश्न जनतेला पडला आहे नांदेड मध्ये गाॅंग वार खुप च वाढला आहे मुंबई सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे वचक कोणाचीही भिती राहिली नाही, सर्रास,खुन, बलात्कार,चोर्या,वाटमार्या, होताना दिसत आहेत, पोलिस फक्त मलीदा खाण्यासाठी आहे त, बाकी जनतेच यांना काही देणं घेणं नाही हेच शिक्षण पोलिसांना दिले आहे का! वरिष्ठ अधिकारी,आय,जी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी लक्ष वेधले पाहिजे नांदेड मध्ये पाच खुन झाले पोलिस यंत्रणा काय करतं आहे,जनते मध्ये आज च्या परिस्थिती त भीती चे वातावरण निर्माण झाले आहे आज वर नागरिक हे समजत होते कि पोलिस म्हणजे जनतेचे रक्षक आहेत आज वर हे निदर्शनास आले त्यांच्या समोर खुन होत आहेत आणि हिच पोलिस यंत्रणा
गुंडांना घाबरत आहे, मुंबई सारखे नांदेड मध्ये गुंडा राज झाले आहे,कारण सर्व काळे धंदे करणारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांना हाताशी धरून त्यांचे खिसे भरून आपली पोळी भाजून घेताना दिसतात त्यामुळे पोलिसांची वचक राहिली नाही, म्हणून तर भर दिवसा, वर्दळीच्या ठिकाणी खुन, बलात्कार,मुली पळवने, सर्रास चालू आहे,हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहून पोलिस यंत्रणा गप्प का बसते जनतेचा रोष वाढताना दिसत आहे त्यावर वरिष्ठ अधिकारी,आय जी, एस पी, जिल्हाधिकारी, यांनी लक्ष वेधले पाहिजे, पोलिस यंत्रणेला कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करुन गुंडांचा हैदोस कायम स्वरुपी थांबवावा नागरिकांना दिलासा मिळेल जनतेच्या मागे पोलिस यंत्रणा आहे हे सिद्ध करुन दाखवले तरच जनतेचा विश्वास वाढेल,,


0 टिप्पण्या