Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा तर्फे सानगडी येथे निरोगी बालक स्पर्धा व बालरोग चिकित्सा शिबिर संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-17 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने सानगडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात (ता. साकोली, जि. भंडारा) निरोगी बालक स्पर्धा व बालरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे यजमानपद ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सरिता उपरीकर यांनी भूषविले. आगामी नवीन कार्यकारिणीत त्या कार्यकारी सचिव म्हणूनही कार्यरत राहणार आहेत.

शिबिरात नवजात बालकांपासून 5 वर्षांपर्यंतच्या एकूण 93 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी बालकांना वाढ व विकास तक्ते वितरित करण्यात आले तसेच त्यांच्या योग्य शारीरिक व मानसिक विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांना डॉ. धनश्री मुंडले (एम.डी. पीडियाट्रिक्स) तसेच डॉ. नितीन तुरस्कर (एम.बी.बी.एस., डी.एन.बी. सर्जरी) यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.या प्रसंगी प. स. सदस्य कृष्णाभाऊ कोयाडवार,अध्यक्षस्थानी होते, डॉ. नितीन तिरपुडे,तमुस अध्यक्ष बनसोड,ग्राम विकास अधिकारी पब्बेवार व सर्व सदस्य कर्मचारी,महिला तथा गाँववासी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला PES हॉस्पिटल, भंडारा तसेच भोजराज भोंडेकर मेडिकल कॉलेज, सिरसी, भंडारा यांचे सहकार्य लाभले.

यावेळी गरजू बालकांना पल्स ऑक्सिमीटर, बेबी सोप तसेच स्नॅक्सचे वितरण करण्यात आले.

प्रेषक : डॉ. नितीन तुरस्कर
सचिव, भारतीय रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या