Ticker

6/recent/ticker-posts

कंजारा येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

           
दयानंद चव्हाण यांची जिल्हा व तालुका प्रशासनाला मागणी             
  
पंकज चव्हाण तालुका प्रतिनिधी हदगाव जिल्हा नांदेड

हदगाव :- मागील आठवडाभरापासून कंजारा परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे
 पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे  शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे
 आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना  करावा लागत आहे,अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या
 पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा चालू खरीप हंगामामध्ये हिमायतनगर तालुका महसूल मंडळात संततधार पाऊस सुरू आहे,पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती,मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती,परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी दयानंद चव्हाण यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या