Ticker

6/recent/ticker-posts

तिबेटियन वसाहतीत जॉब व रेशन कार्डचे वाटप


सरगम शाहारे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी जि.गोंदिया

 अर्जुनी मोरगाव:- तालुक्यातील गोठणगाव - प्रतापगड येथील नार्जेलिंग तिबेटीयन वसाहतीत नुकतेच शांततेचा नोबल पारितोषिक विजेते व तिबेटी अनुयायांचे बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी व तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या उपस्थितीत तिबेटी बांधवांना रेशन आणि जॉबकार्डचे वितरण करण्यात आले . तसेच तिबेटियन वसाहत परिसरात वृक्षारोपणही करण्यात येत होती . कार्यक्रमाचे निमित्त साधून तिबेटीयन विद्यार्थी व युवक - युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपस्थितांना दिली . 

तिबेटीयन बांधवांकडून अनेक वर्षांपासून मोक्षधामाच्या जमिनीची मागणी मोक्षधामाकरिता वनपरिक्षेत्राधिकारी तेलंग यांना सोबत घेऊन जागा देण्यात आली . कार्यक्रमाला तिबेट कॅम्प सेटलमेंट अधिकारी कुंगो धोनडुप ला यांच्यासह तिबेटियन वसाहतीतील महिला - पुरुष , महसूल विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या