Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल व्हाव्यात जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर


सरगम शाहारे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी जि गोंदिया

 अर्जुनी - मोरगाव:- सर्वसामान्यांची शिक्षण वाहिनी म्हणून जिल्हा परिषद शाळांना मान आहे . शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शासकीय शाळा मागे पडल्या आहेत . शिक्षकांमध्ये भरपूर क्षमता आहे . स्वतःला सिद्ध करून जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर आहे . राज्यात अनेक सरकारी शाळांनी नावलौकिक प्राप्त केला प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे .

 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन शासकीय शाळांना मॉडेल बनविण्यासाठी सज्ज राहावे . शिक्षण सभापती म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही , असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती यशवंत गणवीर यांनी केले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कविता कापगते .पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार मुख्याध्यापक आर एच . कटरे , शाळा समिती सदस्य अशोक कापगते, भोजराम रहिले,डॉ दीपक रहिले , अँड . राजेश पालीवाल , संतोष बुकावन , शीला उईके , राधेश्याम भेंडारकर उपस्थित होते . यावेळी गणवीर यांनी शालेय पोषण आहाराची पाहणी केली विद्यालय आणि शाळा समितीतर्फे गणवीर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या