संदीप गिरी सोशल मीडिया प्रमुख चित्रा न्युज
हदगाव:दोन दिवसापासून चालू असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे खूप लुक्सान होत आहे. मा.श्री. माधवराव पाटील देवसरकर साहेब यांच्या आदेशावरून गजानन पाटील यांनी त्याची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हदगाव टीम घेऊन चालू पाण्यात पाहणी केली.राज्यसरकारने लवकरात लवकर हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.पहिल्यांदा पाणी कमी असल्या मुळे दोनदा पेरणी करावी लागली आणि आता पाण्यामुळे सर्व आलेले जाण्याच्या मार्गावर.या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना निसर्ग राजा कडून धोका.दर वर्षी असच राहील तर शेती कोण करणार.त्या साठी कमीत कमी राज्यसरकारने तरी शेतकऱ्यांना नाराज न करता त्याच्या कडे आर्थिक लक्ष्य देऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने केली.त्या वेळी त्याच्या सोबत उपस्थित असलेले संदीप गिरी,सूरज सोनू,विकास सोळंके,एम.जे पाटील,साई सोळंके तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हदगाव चे पद अधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या