Ticker

6/recent/ticker-posts

मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्याच्या कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार

रोहन सोनवणे... विशेष क्राइम प्रतिनिधी महा. मो:9359426856

पुणे: मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेली 20 वर्षीय तरुणी दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पुण्याच्या कर्वेनगर परिसरात 27 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वप्निल ठाणगे (वय 24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. 20 वर्षी पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 27 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या कर्वेनगर परिसरातील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी आणखीही काही तरुण उपस्थित होते. पार्टी झाल्यानंतर फिर्यादी या दारूच्या अर्धवट नशेत असताना फिर्यादी यांच्या मित्राचा मित्र असलेल्या स्वप्निल ठाणगे याने फिर्यादी यांना गॅलरीत घेऊन जात गॅलरीचा दरवाजा बंद केला आणि फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या