कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधांचे पूर्ततेकरिता शासन प्रयत्नशील असून याकरिता अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक त्या निधीची पूर्तताही केली जाते. पण क्रियान्वयन यंत्रणेतील काही भ्रष्ट अभियंत्यामुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय कन्हाळगाव ग्रामपंचायतीत आला. १५वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत तयार केलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मुरूमाने भरल्या नसल्याने लगतच्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचा आरोप होत असून चौकशीची मागणी होत आहे.
दिघोरी ते गुरढा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील महादेव मेश्राम ते विद्याधर बावनकुळे यांच्या घराजवळून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे दुचाकीस्वारांना आवागमन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. गावकऱ्यांच्या मागणीवरून १५वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर योजनेअंतर्गत महादेव मेश्राम ते विद्याधर बावनकुळे यांचे घरापर्यंत ३ लक्ष १५ हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामास आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनामा ग्रामपंचायत कन्हाळगाव चे नावाने असून या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामावर तांत्रिक मार्गदर्शन देखरेख व सनियंत्रणाचे काम लाखनी पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन गाढवे यांचेकडे सोपविण्यात आले होते. सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन ६ महिन्याचा कालावधी लोटला असताना सुद्धा या सिमेंट रत्याच्या दोन्ही बाजूच्या कडा मुरुमाने भरल्या नसल्यामुळे या रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरून घरी ट्रॅक्टर किंवा बैलगाडी नेतांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर डांबरी रस्त्याच्या कडा मुरुमाने भरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. अशी मागणी होत आहे.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
कन्हाळगाव येथे १५वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. अंदाजपत्रकात दर्शविल्यापेक्षा अधिक प्रमाणात मुरुमाचा वापर करण्यात आला.
*शैलश नंदेश्वर, ग्रामसेवक कन्हाळगाव*


0 टिप्पण्या