Ticker

6/recent/ticker-posts

गायरान गावठाण अतिक्रम वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्ष उतरणार रस्त्यावर

औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाची ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न............

 गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,

औरंगाबाद-: येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २४/११/२०२२ गुरुवार रोजी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव दादा कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीला मा. बाबुराव कदम दादा (महाराष्ट्र कार्याध्यक्ष),मा. दौलत खरात( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष),मा.मिलिंद अण्णा शेळके( मराठवाडा अध्यक्ष),मा. दिलीप पाडमुख, मा.एस.डी. मगरे सर, मा.किशोर भाऊ थोरात (माझी उपमहापौर औरंगाबाद),मा. बाळकृष्ण इंगळे (जिल्हाध्यक्ष), मा.संजयजी ठोकळ (जिल्हाध्यक्ष), रिपाई नेते मा. अरविंद आवरसमल काका मा.अमोल भैया नरवडे (मराठवाडा प्रदेश संघटक), प्रवीण आप्पा नितनवरे (जिल्हा संघटक), नागराज भाऊ गायकवाड( शहराध्यक्ष औरंगाबाद), युवा नेते जयकीशन कांबळे, कुंदन लाटे, जगन्नाथ साळवे मामा (पैठण तालुका अध्यक्ष), सुनिल आडसुळ(शहराध्यक्ष पैठण),विष्णु खंडागळे (पैठण तालुका उपाध्यक्ष),गौतम सोनवणे (पैठण तालुका उपाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीमध्ये मान्यवरांनी गायरान गावठाण अतिक्रम या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. व न्यायालयाने जो आदेश काढला तो आदेश बहुजन समाजातील गोरगरीब जनतेला व गावठाण गायरान धारकांना संपविण्यासाठी हा आदेश शासनाला दिलेला आहे. या आदेशा विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया((आठवले) पक्षाच्या वतीने गायरान वाचविण्यासाठी मोठे आंदोलन केले जानार आहे.व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्ष हा गोरगरीब वंचित व गायरान धारकांच्या खंबीरपणे पाठीमागे उभा आहे. असे पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुरावजी कदम दादा कदम म्हणाले.कदम दादा बोलताना पुढे म्हणाली की,गायराण धारकांनी कोणीही अतिक्रम हटवणार नाही. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोरगरीब वंचित भूमीही गायराण धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून पैठण,गंगापूर,वैजापूर, सिल्लोड, सोयगाव,खुलताबाद,कन्नड फुलंब्री या तालुक्यातून तालुका अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते गायरान धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायरान वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात व महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभा करणार आहे. तरी गायन धारकांनी घाबरायचं नाही व खचून न जाता या होणार्‍या गायरान बचाव आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान या बैठकीमध्ये करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या