Ticker

6/recent/ticker-posts

भडगाव तालुक्यातील ८१शेतपाणंद रस्ते मंजूर

 आहैत.पैकी ४२रस्त्यांचा निधी भडगाव तहसीलदार कडे येऊन ठेपला आहे.पण अजून रस्ते बनवत नाहीत.मागील वर्षी सुध्दा ३३ रस्त्याचा निधी आला होता परंतु प्रत्यक्षात फक्त ३ बनवले असल्याचे दिसते.बाकी सब गोलमाल है.
      शेतकरी बहुधा अशिक्षित असतात.काही शिक्षीत असले तरी आमदाराला, तहसिलदाराला विचारण्याचे धाडस करीत नाहीत.कारण आपण सरकार च्या मेहरबानी ने जगतो,असा समज शेतकऱ्यांमध्ये आहे.म्हणून ते आमदार आणि तहसीलदार ला दचकून वचकून असतात.अजून असा प्रामाणिक आमदार आणि तहसीलदार आढळला नाही कि ते ग्रामपंचायत ला कळवतील कि तुमच्या गाव शेत शिवारात इतके शेतपाणंद रस्ते मंजूर आहेत.शेतकरी आंधळा असतो .पण आता शेतकरी जागृत होत आहे.आता तो दळण करील आणि आमदार, तहसीलदार पीठ खाऊन जातील.अशी वेळ येऊ देणार नाही.आमदाराला तगडे मानधन मिळते.प्रत्येक कामातून कमीशन मिळते.नाही मिळाले तरच बोंबा मारतात.मिळाले कि गुपचूप बसतात.तहसिलदाराला ही चांगला पगार असतो.तर मग, शेतकऱ्यांच्या ताटातील नाही खाल्ले तर काहीच उपासमार होणार नाही.
     जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील शेतकरी जागृत व्हावा,खंबीर व्हावा,धीट व्हावा म्हणून त्यांना त्यांच्या हिताची माहिती देणे आवश्यक आहे.आमदार , तहसीलदार देत नाहीत म्हणून संघटना व जनमंच देत असतो.
     मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे अभिमानाने सांगतात कि मी शेतकरी आहे.फावल्या वेळात मी सातारा च्या शेतात जाऊन नांगरणी वखरणी करतो.तर मग, मुख्यमंत्र्यांच्या शेतात रस्ता असेलच ना! कि हेलिकॉप्टर ने घर ते शेत ये जा करतात?तसे रस्ते आम्हाला आमच्या शेतात ही बनवले पाहिजे.म्हणतात ते ,पैसा अपुरा पडू देणार नाही.पण मधेच कोणी खाऊन जात असेल, चाटून जात असेल त्यांच्या माथी काठी मारण्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदेंची आहे.फक्त घोषणा देऊन चालणार नाही.फक्त तव्यावर पाणी शिंपडून चालणार नाही.भजी तर तळली पाहिजे.
      महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनिल देवरे,अभिमान हटकर तसेच जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे शिवराम पाटील व राकेश वाघ सोबत उद्धव ठाकरे सेनेचे तालुका उपाध्यक्ष. शिवप्रसाद जगताप,युवा शहराध्यक्ष चेतन पाटील शहर अध्यक्ष शंकर मारवाडी यांनी भडगाव बस स्टॉप समोर आंदोलन केले.तहसिलदार महोदयांनी भेट देऊन रस्ते बनवण्याचे आश्वासन तर दिले.आमदार आणि बीडीओ गायब होते.
      शेतकरी बांधवांसाठी सरकार खूप काही देते.पण आमदार खासदार मंडप टाकून खाऊपिऊ घालतात.शेतकरी खुष होतात.आमदार पडद्याआड अनुदानाचा मलिदा खाऊन जातात.जर आमदार एका निवडणुकीत आठ दहा कोटी खर्च करतात तर दोन तीन निवडणुकीत तर त्यांचे दिवाळे निघून त्यांनी आत्महत्या केली पाहिजे.जर ते प्रामाणिक असतील तर! पण अजून तरी एकाही आमदारांचे दिवाळे निघाले नाही.कर्जबाजारी झाला नाही.का? याचे रहस्य शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे, माहिती केले पाहिजे. आमदारांच्या संपत्तीचा , श्रीमंतीचा स्रोत शेतकऱ्यांच्या रक्तातूनच पाझरतो.हे मात्र नक्की.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या