पैठण प्रतिनिधी गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128428
पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्था(अ) ची निवडणूक दि. २/११/२०२२ रोजी ७४ जळगाव येथील जि.प.प्रा.शाळा येथे पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री अशोक दादा एरंडे (माजी उपसभापती पंचायत समिती पैठण) यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा शेतकरी विकास पॅनलचे १२ पैकी १२ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झालेले आहे. दि. २२/११/२०२२ रोजी पैठण येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय पैठण येथे श्री प्रदीप कदम (लेखा परीक्षक श्रेणी संस्था औरंगाबाद) व श्री निलेश धिरडे( सोसायटी सचिव)यांच्या हस्ते ७४ जळगाव विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था (अ) च्या चेअरमन पदी श्री किशोर अशोक एरंडे व व्हाईस चेअरमन पदी श्री कल्याण सुक्रे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी कल्यान काका एरंडे (माजी चेअरमन),केशव अप्पा एरंडे (माजी व्हा.चेअरमन),देवीदास एरंडे,दिलीप गटकळ,युवा नेते संदीप अशोक एरंडे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन व सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभच्छा देऊन अभिनंदन केले.नवनिर्वाचित सदस्य अरविंद कल्यान एरंडे,ज्ञानदेव यादव एरंडे,विजय केशव एरंडे,बबन बाबुराव मुळे,नारायन देवराव लाटे,मच्छिंद्र मुरलीधर शिंदे,येल्हनबाई रखमाजी जगधणे,शिंधुबाई अंकुश नजन,संगीता लहु सोलाट,सरस्वती भाऊसाहेब गरड यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या