Ticker

6/recent/ticker-posts

न्यू इग्लिश स्कूल म्हसळा येथे पोलीस भरतीविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संपन्न


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

अलिबाग:-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सकल्पनेतून साकारलेल्या “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राबाबत उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन अमित शेडगे यांच्या उपस्थितीत न्यू इग्लिश स्कूल म्हसळा येथे नुकतेच विशेष प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. 
यावेळी तहसिलदार म्हसळा समिर घारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसळा श्री.सोनावणे तसेच द्रोणाचार्य करीअर मार्गदर्शन केंद्र, रोहा चे प्रतिनिधी स्वप्नील सकपाळ यांनी प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
या शिबीरामध्ये म्हसळा तालुक्यातील 180 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तके उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण वर्ग चालू करणे इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या