Ticker

6/recent/ticker-posts

स्थागुशाची हाळी ते शिरुर रोडवर कारवाई....

२लाखाच्या गुटख्यासह १आरोपी व कार ताब्यात....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर.:-वरिष्ठांच्या आदेशावरुन ठोक व किरकोळ विक्री करणा-या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मोहिम तीव्र झाल्याचे बोलले जात असलेतरीही ही मोहिम म्हणजे 'बोलाचाच भात..' असे म्हटले तर चूक होणार नाही.
कारण,कर्नाटकातून गुटखा घेऊन निघालेल्या गाड्या वाटेत असलेल्या देवणी,उदगीर शहर व ग्रामीण असे ३ तीन ठाणे विनाविघ्न 'क्राॅस' करुन वाढवणा मार्गे हाळी ते अहमदपुर जात असल्याचे सामान्यांना दिसतात.म्हणुन याबाबत परवाच आम्ही रोखठोक बातमी दिली असता. त्याची दखल घेत एलसीबी पथकाने दि.२२ रोजी हाळी ते शिरुरताजबंद रोडवर सापळा लावून अहमदपुरात दिनदहाडे गुटखा घेऊन जाणारी कार पकडली.
याची थोडक्यात माहिती अशी की,वरिष्ठांचे आदेश आणि आमच्या बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन स्थागुशा लातुरच्या पथकाने वाढोणा पो.स्टे.हद्दीत असलेल्या हाळी ते शिरुरताजबंद रोडवर दि.२२ रोजी सापळा लावला असता MH 05-DH-5266 क्रमांकाची बोलेनो कार संशयास्पदरित्या येत असल्याचे दिसताच ती थांबवून तिची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला १,८७,२०० रु.चा गुटखा,सुगंधीत जर्दा मिळून आला. सोबतच गुटख्याची वाहतूक करणारी ४ लाख किंमतीची १ कार मिळून आली असून आरोपी मुबीन सिद्दीख सय्यद वय.२९वर्षे रा.दर्गापुर, अहमदपुर जि.लातुर याच्याविरुध्द पो.स्टे. वाढवणा येथे १२३,२७४, २७५,२२३ BNS प्रमाणे गुन्हा नोंद केला असून कर्तबगार पोउपनि.प्रवीण हालसे याचा पुढील तपास करत आहेत.

स्थागुशाने केलेली ही कारवाई कौतूकास्पद आहे.
माञ तरीही कांही प्रश्न निर्माण होतातच!!
१)देवणी तसेच उदगीर शहर व ग्रामीण असे तीन ३ पोलिस ठाणे असतानाही कर्नाटकातून गुटखा व तत्सम सुगंधी जर्दा घेऊन ही कार अहमदपुर शहराकडे विनाविघ्न ते ही दिनदहाडे जात कशी होती?
२)या रोडवर आयजी, एसपी व एलसीबीचे पथक अधून-मधून ''चमकतात''तरीही वरील तीन ३ पोलिस ठाणे 'पास' करुन अहमदपुर शहरात कांही गाड्यांतून रोज लाखोंचा गुटखा आजही जातोय,असे हाळीत बोलले जाते.तेंव्हा वरील ३ ठाण्यातील ''खा-की'' वाले करतात काय?
३)वाढवणा पोलिसांना मानसिक ञास देण्यासाठीच तर रेड होत नाहीत ना?
४)हाळी,हंडरगुळी,मोरतळवाडी,चिमाचीवाडी व सुकणीत गुटख्याचा 'बोलबाला' कसा?
५)अहमदपुरच्या गुटखा तस्करांशी कुणाकुणाचा आहे 'दोस्ताना'?
६)सदर कार ज्या कुणाची आहे,त्याच्यावर ही गुन्हा दाखल होणार का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या