रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
संगमनेर -: तालुक्यातून जाणार्या नवीन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावरील कुरकुंडी शिवारात महामार्गाच्या कडेला साईडगटारात गुरुवार (ता.२४) नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास कार उलटली आहे. या अपघातात सुदैवाने चौघेजण बालंबाल बचावले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरकुंडी शिवारातील वायाळवाडी येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला असलेल्या साईडगटारीत कार उलटली आहे. कार उलटल्याची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, चालक संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली.केवळ दैव बलवत्तर असल्याने चौघेजण बालंबाल बचावले आहेत.


0 टिप्पण्या