कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील पंचायत समिती चे सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज पाटील यांना बढती मिळून कुरखेडा पंचायत समितीत पद स्थापना झाली. त्यांचे रिक्त जागेचा अतिरिक्त प्रभार कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर यांचेकडे सोपविण्यात आला होता. ग्रामविकास विभागाने साकोली पंचायत समितीच्या कृषी अधिकारी श्रीमती आर.आर. डोंगरे यांना पदोन्नती देऊन लाखनी येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शुक्रवार(ता.१८) ला कार्यभार स्वीकारला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी एम.के. जांभूळकर, कृषी विस्तार अधिकारी के.एन. चव्हाण, पंचायत विस्तार अधिकारी पी.आर. हुमने, सहाय्यक प्रशासन अधिकारी एम. डी. केवट, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए.यु. देव्हारे, संजय तिरसागडे, सहाय्यक लेखा अधिकारी आर. व्हि. ढोमने, कनिष्ठ लेखा अधिकारी बी. आर. बांगडे, एस.एस. भाकरे, एस. डी. मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीमती एन. टी. घरडे, व्ही.एच. मेश्राम, एच.एस. बडगे यांचे पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या