रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातुन अनुयायी चैत्यभुमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची गैरसोय घेऊ नये, यासाठी मागील काही वर्षापासुन 5 ते 6 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी स्वंयसेवकांच्या (VBA Volunteers) माध्यमातुन शिवाजी पार्क परिसरात काम करत आहे.
काम करत असताना महानगरपालिकेकडुन अपुऱ्या सुविधा पुरवतात, असे आढळून आले आहे. त्या सर्व बाबींचे पुरावे घेऊन वंचितच्यावतीने संबंधित अधिकारी यांना भेटुन काही सुचना तसेच मागण्या करण्यात आल्या. सर्व सूचनांची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील नियोजनाच्या बैठकीस वंचित बहुजन आघाडीला महानगरपालिकातर्फे आमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, स्नेहल सोहनी, कमलेश उबाळे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी अनुयायांनी गैरसोय होऊ नये यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन स्वप्नील जवळगेकर यांनी केले.


0 टिप्पण्या