Ticker

6/recent/ticker-posts

मिलिंद नगर जामखेड येथे संविधान दिन साजरा...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- 
           आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व संविधानाच्या प्रस्थावनेचे वाचुन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिम टोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाप्पुसाहेब गायकवाड, वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुकाध्यक्ष आतिश पारवे, सामाजिक कार्यकर्ते सखाराम वारभोग, शुभम गायकवाड, दिपक घायतडक, राजु शिरोळे, दत्ता जगताप, बौध्द महासभेच्या अरुणाबाई सदाफुले, मालनबाई घायकडक, पमाबाई घायतडक. वाघमारे ताई आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बाप्पुसाहेब यांनी प्रस्ताविकमध्ये भारतीय संविधानाचे महत्व, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले परिश्रम ,व कसे झाले बाबासाहेब घटनेचे शिल्पकार ते सांगितले व संविधानाच्या प्रस्थावनेचे वाचन करुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या