Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक २ जखमी

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

नाशिक :-पाथर्डी फाटा भागात भरधाव कारच्या धडकेत आजी आणि नाती जखमी झाल्याची घटना घडली . अलका पवार या आपल्या दोन नातींना सोबत घेवून घराबाहेर पडल्या होत्या . पाथर्डी रोडने त्या फेरफटका मारत असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १२ क्यू एम ६५३८ या अल्टोकारने तिघींना धडक दिली . या अपघातात एका नातीच्या पायाचे बोट फॅक्चर झाले असून दुसरी जमिनीवर पडल्याने तिच्या कपाळास आणि आजीलाही गंभीर दुखापत झाली आहे . अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला . अलका आनंदा पवार ( पाथर्डी रोड ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे . याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पसार झालेल्या अल्टो कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या