अकोला :- राज्यभरात गोवर या साथरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे . परंतु अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात या साथ रोगाच्या रुग्णांचा आकडा आरोग्य यंत्रणेनुसार निरंकार आहे . तरी लक्षणे आढळल्यास तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आ गोवर सारख्या साथ रोगाचे राज्यभरात निघणाऱ्या रुग्णांची स्थिती बघता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सतर्कता बागळुन आहे . राज्यस्तरीय आरोग्य विभागाकडून रुग्णाची शोध मोहीम आणि मार्गदर्शिक सुचना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे . या गोवर साथ रोगाचा प्रादूर्भाव सध्या जरी नसला तरी ताप येणे , अंगावर फुलर येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत सदर रुग्णांची तपासणी जवळच्या शासकीय रुग्णालयात करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . सध्या अकोला जिल्ह्यात एकही गोवरचा रुग्ण नसल्याची माहिती जिल्ह परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ . सुरेश आसोले यांनी दिली .


0 टिप्पण्या