Ticker

6/recent/ticker-posts

वंचित'च्यावतीने वसईमध्ये संविधान रॅली संपन्न !


 रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

   
मुंबई :- वंचित बहुजन आघाडी  वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र  महिला अध्यक्ष गीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान रॅलीचे आयोजन आणि बहुउद्देशीय बहुजन महिला मंडळ यांची संयुक्त रॅलीचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच माता रमाबाई आंबेडकर चौक ते माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन संविधान उद्देशिका देऊन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

या नंतर माता रमाबाई नगर नौपाडा येथे रॅलीचे समारोप झाले. त्यानंतर पुढील कार्यक्रमात बहुउद्देशीय बहुजन महिला मंडळकडून सत्कार समारंभ आणि लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमा ठोके आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात वंचित बहुजन महिला आघाडी व वि शहर महानगपालिका महीला अध्यक्ष गीता जाधव यांचे माता रमाबाई नगरमधील रहिवाशांनी विशेष सत्कार करून माता रमाबाई नगर मध्ये कोणाच्याही धमकीला न घाबरता लाईट आणि पाणी आणून दिल्या बद्दल विशेष मानले. 

वंचित बहुजन आघाडीचे महासचिव उत्तम लोखंडे यांनी  संविधान दिनाबद्दल  मार्गदर्शन केले. यावेळेस उत्तम लोखंडे, गीता जाधव, रोहित ठोबरे, रेश्मा कहार सूर्या गवई, प्रेरणा भेकरे, स्मिता मनोहर, सरिता बिंद, साक्षी जाधव, समीर शेख, मनिषा पवार, निकिता खैरे, अशोक कुमार गौतम, सुविध पवार, समीर मोहिते, सोनू गायकवाड, अर्जुन पाटेकर, अमर जगताप, तसेच बहुउद्देशीय बहुजन महिला मंडळच्या अध्यक्षा उमा ठोके, मंनाडी शेख, सिद्धार्थ सपकाळ, कपूर प्रेम सिंग, संगीता लंकेश्वर, संगीता सपकाळ, नारायण उचित, सुभाष ठोके, शरदजी तिगोटे आणि माता रमाबाई नगर नौपाडा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या