Ticker

6/recent/ticker-posts

करंट लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


नागपूर :- वीज वितरण कंपनीचे महादुला येथील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील एका डि . पी . स्ट्रक्चरवर चढून काम करीत असताना जंपरचा जोरदार विद्युत धक्का लागून बोरी येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवार , ३० नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली . गौरव नगरारे ( वय २८ , रा . बोरी ) असे मृत तरुणाचे नाव आहे . तो अविवाहीत होता . प्राप्त माहितीनुसार , महादुला परिसरात असलेल्या मोहने यांच्या राईस मिलजवळच्या विद्युत डिपी स्ट्रक्चरवर काही बिघाड आला होता . तेव्हा विज वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत मृतक गौरव हा तिथे काम करण्यासाठी आला होता . दरम्यान , दुपारच्या सुमारास डि . पी . स्ट्रक्टरवर चढुन दुरुस्ती करताना गौरवला जंपरचा करंट लागला . त्यामुळे तो दूर फेकल्या गेला . त्याच्या पाठीचा भाग भाजला होता . उंचावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती . लगेच त्याला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले . तेथून पुढे त्याला नागपूरला रेफर करण्यात आले . दरम्यान मनसरच्या जवळपास गौरवने प्राण सोडला . घटनेने वीज वितरण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली असून बोरी गावात शोककडा पसरली आहे . गौरव हा खाजगी वायरमन होता . तो वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत फिरायचा अशी प्राथमिक माहिती मिळाली असून असे असले तरी एका खासगी वायरमनकडून वीज वितरण कंपनीच्या लाईनची कामे करून घेता येतात का ? असे असेल तर मग वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम कोणते ? असे अनेक प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या