Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगर जिल्हयात " महारेशीम अभियान -२०२३" अंतर्गत नांव नोंदणी सुरूइच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

  अहमदनगर :-
  महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत राज्यातील शेतक-यांकरीता हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी देणा-या रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी राज्यात दरवर्षी महारेशीम अभियान राबवून नविन शेतक-यांची निवड करण्यात येते. सन २०२३-२४ मध्ये रेशीम उद्योग करणाया शेतक-यांच्या नांव नोंदणीसाठी दि. १५ नोहेंबर २०२२ ते दि. १५ डिसेंबर २०२२ अखेर अहमदनगर जिल्हयात 'महारेशीम अभियान २०२३ " राबविण्यात येत आहे..
   रेशीम उद्योग योजनेच्या माहिती संदर्भात व नावनोंदणी करण्याकरीता इच्छुक शेतक-यांनी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१, जिल्हा रेशीम कार्यालय पितळे कॉलनी, महागणपती मंदिराशेजारी, नागापूर अहमदनगर येथे प्रत्यक्ष अथवा ०२४१-२४२८५४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्रेणी-1, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या