Ticker

6/recent/ticker-posts

रब्बी हंगाम 2022 मध्ये 6 हजार 750 हेक्टर क्षेत्रात लागवड


लाख लाखोरी पिकांना वातावरणाचा फटका

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यात खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असून रब्बी हंगामात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य व मसाला पिकांच्या 6 हजार 750 हेक्टर क्षेत्र पेरण्या जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पण लाख लाखोरी पिकांना वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
          साकोली व लाखांदुर तालुक्याचा विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र 28 हजार 555 हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र 24 हजार 960 आहे त्यापैकी 22 हजार 631 हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर 6 हजार 747 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवट केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्ये, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते. अन्नधान्य पिकात गहु 1 हजार 14 हेक्टर, मका 74 हेक्टर, कडधान्यात हरभरा 1 हजार 262 हेक्टर, लाख, लाखोरी 1 हजार 330 हेक्टर, उडीद 548 हेक्टर, मुंग 520 हेक्टर, वटाणा 181 हेक्टर, पोपट 190 हेक्टर, मसूर 46 हेक्टर. गळीत धान्यात करडई 25 हेक्टर, भुईमूग 3. 5 हेक्टर, मसाला पिकात धने 97 हेक्टर, मिरची 47 हेक्टर कांदा 6.5 हेक्टर. भाजीपाला जन्य पिके 646 हेक्टर, पपई 2 हेक्टर, सोनबोरू 201 हेक्टर. चारापिके 187 हेक्टर असे एकुण 6 हजार 750 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे लाख व लाखोरी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 *प्रतिक्रिया स्टेटमेंट(चौकट)*
रब्बी हंगाम 2022 मध्ये अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य व मसाला पिकांची 6 हजार 750 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात येणार आहे. जवळपास पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. तर लाखोरी पिकास वातावरणाचा फटका बसू शकतो. 
*एम.के. जांभूळकर कृषी अधिकारी प. स. लाखनी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या