दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
नागपूर :- डिसेंबरचा पहिल्या आठवड्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने घसरून १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे नागपूरसह विदर्भात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवणार आहे . डिसेंबर सुरू होत असून हळूहळू दिवस व रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू होईल . बुधवारी किमान तापमान काही अंशाने वाढले असले तरी सरासरीपेक्षा १. ६ अंशाने कमी आहे . नागपूरचे किमान तापमान १२. ६ अंश नोंदविण्यात आले . गोंदियाला सर्वात कमी ११. ८ अंशाची नोंद झाली आहे .


0 टिप्पण्या