मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 1 डिसेंबर पाठपुरावा करूनही ठाकरे सरकारने ज्यासाठी साधी बैठक घेतली नाही, तत्कालीन मंत्री महोदयांवर ज्यासाठी हक्कभंग दाखल करावा लागला.. धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने सुमारे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा हातभार लावला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जोडून येथील अर्थकारणाला गती देण्याच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी या मार्गासाठी मंजुरीचा शब्द दिला होता.
या अनुषंगाने काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी ९०४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ८ जानेवारी २०१९ रोजी राज्य सरकारतर्फे ५०% खर्चाची तयारी दाखवून प्रकल्प मंजुरी मिळवली होती. तसेच केंद्र सरकारने सुमारे ३० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे सातत्याने पाठपुरावा करूनही साधी बैठक घेतली गेली नाही. तत्कालीन मंत्री श्री. अनिल परब साहेबांवर हक्कभंग देखील दाखल करावा लागला. तरीही या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने कसलीही तरतूद केली नाही.
परंतु राज्यात सर्वसामान्य जनतेचे 'आपले सरकार' अस्तित्वात आल्यानंतर विकासकामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासास गती प्राप्त होत आहे.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील उद्योग, दळणवळणाचे प्रमाण वाढून दरडोई उत्पन्न वाढणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांतर्फे शिंदे-फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार !


0 टिप्पण्या