Ticker

6/recent/ticker-posts

मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे तब्बल दोन वर्षापासून पोल्ट्री फील्ड लोन प्रलंबित आहे



चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्यूज मो‌. ८८८८११७९७५
नांदेड-: मुखेड तालुक्यातील मोजे कबनूर येथील रहिवासी बंडू खंडेराव तालीमकर यांनी पोल्ट्री फिल्ड या लोन साठी मौजे बा-हाळी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेकडे संबंधित सर्व कागदपत्रासह लोणची फाईल दाखल केली असता आतापर्यंत किमान दोन वर्ष उलटूनही लोन मंजूर होत नसल्याने आज जिल्हाधिकार्यालय नांदेड येथील आपल्या कुटुंबासह उपोषणास बसणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे सविस्तर वृत्त असे की बंडू खंडेराव तालीमकर रा. कबनूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या मौजे बा-हाळी येथील मालमत्ता क्रमांक ३५० क्षेत्र ३४ ते ३० एकूण ११२२चौ फुट व. मालमत्ता क्र ३४६८ क्षेत्र ३४४२एकुण १२००चौ. फुट या मलमतेवर १२,५०,००० रुपये व १५,००,००० अशी पि. एम. इ.जि. पि प्रोजेक्ट नुसार लोन मिळवण्यासाठी मौजे बा-हाळी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेकडे संबंधित सर्व कागदपत्रासह लोणची फाईल दाखल केली होती पण सदरील लोनची रक्कम जास्त असल्याने बँक मॅनेजर वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांना लोन मंजूर करून देण्यासाठी ५०% लाचेची मागणी केली होती सदरील मागणी बेकायदेशीर असल्याने त्यांच्या या मागणीस मी नकार दिल्यानंतर सदरील बँक मॅनेजर नी लोन देण्यासनकार दिल्याचे ही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या