Ticker

6/recent/ticker-posts

अपघातात चोरटा गंभीर जखमी.

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


वर्धा :- दुचाकी चोरून पळत असलेला चोरटा दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पडून गंभीर रित्या जखमी झाला ही घटना देवळी तालुक्यातील टोल नाका परिसरात घडली . जखमीचे नाव अमोल . नामदेवराव सगने राहणार . परतवाडा जिल्हा अमरावती असे सांगण्यात येते . या जखमी तरुणाने देवळी तालुक्यातीलच . शिरपूर ( होरे या गावातून एक दुचाकी चोरली . ती चोरीची दुचाकी घेऊन तो पळत असताना . हुस्नापूर येथील टोलनाक्यावर पोहोचला वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित झाली त्यामुळे अमोल हा दुचाकीसह रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला . ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी टोलनाक्यावर पोलीस कर्मचारी उपस्थित होते . त्यांनी जखमी तरुणासह दुचाकी ताब्यात घेतली . चौकशी केली तेव्हा ती दुचाकी चोरीची असल्याचे पुढे आले . या घटने प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात . गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या