Ticker

6/recent/ticker-posts

दुकान फोडून साहित्य लंपास

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


सांगली :शहरातील झारीबाग जवळ मार्केट यार्ड लगत असलेले मार्बल दुकान फोडून चोरट्यांनी विविध प्रकारचे सुमारे 44 हजार 700 रुपयांचे साहित्य चोरून नेले . रात्रीच्या सुमारास सदर चोरीची घटना घडली आहे . या प्रकरणी दुकान मालक रमेश नवाराम कुमावत वय 59 वर्ष राहणार शितल छाया अपार्टमेंट दुसरा मजला अरुणोदय हॉस्पिटल समोर शिवाजीनगर मिरज यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे . याबाबत अधिक माहिती अशी रमेश कुमावत यांचे झारीबागेजवळ मार्बल विक्रीचे दुकान आहे . या दुकानात त्यांनी मार्बल तयार करण्यासाठी साहित्य ठेवले होते . रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून कुमावत घरी गेले रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी सदर दुकान फोडले , व दुकानातील सुमारे 44 हजार सातशे रुपयांचे विविध प्रकारचे साहित्य चोरून नेले . बुधवारी सकाळी कुमावत हे दुकान उघडण्यासाठी आले असता , त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले . याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे . त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या