Ticker

6/recent/ticker-posts

परळी रेल्वे स्थानकात विद्युतीकरणाचे काम गतिमान



दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


बीड :-मराठवाड्यात रेल्वेची विद्युतीकरण मोठ्या प्रमाणात होत असून याचा फायदा या भागातील प्रवासी नागरिकां बरोबरच औष्णिक वीज केंद्रासाठी लागणाऱ्या कोळशांच्या रॅक , आणि मोठ्या प्रमाणात सिमेंट , स्टील या अवजड सामानाच्या जलद वाहतुकीसाठी मदत होणार आहे . येत्या काही दिवसात डिझेल इंजिनची धडधड बंद होऊन इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह या मार्गावर धावू लागतील . परभणी ते परळी हे सुमारे ६४ किलोमीटरचे अंतर असून या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे . परळी रेल्वे स्थानकामध्ये विद्युतीकरणाचे खांब उभारण्यास गती मिळाली असून वेगाने हे काम होत आहे . परळी रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या दोन डिव्हिजन चे केंद्रबिंदू आहे . सिकंदराबाद डिव्हिजन आणि नांदेड डिव्हिजन या दोन्ही डिव्हिजन चा प्रभाव येथे प्रामुख्याने दिसून येतो .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या