दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
बीड :- जिल्ह्यात होत असलेल्या ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी पाच दिवसात २४ हजार ७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले . यात सरपंचपदासाठी ४२१६. तर सदस्यपदासाठी १ ९ हजार ८६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून , ५ डिसेंबर रोजी छाननीनंतर उमेदवारी अर्जाची स्थिती स्पष्ट होणार आहे . छाननीत आपला अर्ज टिकतो की उडतो , याची तगमग उमेदवारांमध्ये दिसून आली . डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली . उमेदवारी अर्ज यंदा ऑनलाइन भरावयाचे होते ; परंतु निवडणूक विभागाची वेबसाइट हँग होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने आयोगाने सूचना केल्या . त्यानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले . तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा अवधी दिल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी झाली होती .


0 टिप्पण्या