Ticker

6/recent/ticker-posts

सारंगखेडा यात्रेसाठी आरोग्य विभागाची पथके सज्ज


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

नंदुरबार :- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे . त्या अनुषंगाने विविध शासकीय विभाग यात्रेसाठी सज्ज झाले असून , वेगवेगळ्या पथकांना दत्त मंदिर परिसर , घोडे बाजार व बाजार परिसरात सज्ज ठेवण्यात येणार आहे . सारंगखेडा येथील ऐतिहासिक यात्रोत्सवाला गेल्या ४०० वर्षांची परंपरा आहे . सारंगखेडा येथे यात्रा उत्सवानिमित्त चेतक महोत्सवामुळे सारंगखेडाची यात्रा ग्लोबल झाली आहे . भरणाऱ्या सारंगखेडाची ओळख ही जगाच्या नकाशावर झाल्याने येथे विदेशी पर्यटक देखील हजेरी लावतात सारंगखेडा येथे यात्रा उत्सव पाहण्यासाठी दत्त दर्शन घेण्यासाठी तसेच अश्व प्रेमी अश्व खरेदीसह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात यावेळी व्यावसायिक व यात्रेकरू पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . कांतीलाल पावरा व डॉ किशोर पाटील यांनी ३८ लोकांची यात्रेदरम्यान नेमणूक केली तीन • तीन आहे . यात लोकांचे पथक तयार करण्यात आले असून त्यात एक डॉक्टर एक नर्स व एका आरोग्य सेवकाचा समावेश आहे . हे पथक दत्त मंदिर , घोडे बाजार व यात्रा परिसर या ठिकाणी सत्रांमध्ये २४ तास तैनात राहणार आहेत . त्याचबरोबर १०८ क्रमांकाची एक अॅम्बुलन्स घोडे बाजार परिसरात व एक अॅम्बुलन्स यात्रा परिसरात २४ तास तैनात राहणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ बाय ७ सेवा पुरविली जाणार आहे . सर्व कर्मचाऱ्यांशी सुसंवाद व संपर्क ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती डॉ कांतीलाल पावरा यांनी दिली . त्याचबरोबर साथ रोगाचे पथक देखील संपूर्ण यात्रा परिसरात २४ तास फिरणार असून , प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा देखील मागविण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . पावरा यांनी दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या