Ticker

6/recent/ticker-posts

बस वाहकाचा प्रवाशांशी असभ्य व्यवहार


 सानगडी ते भंडारा बस मधील प्रकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- सानगडी वरून भंडारा कडे जाणाऱ्या साकोली आगाराचे बसमध्ये एका मुलीला त्रास दिल्या बद्दल वाहक आणि प्रवाशांची बाचाबाची झाल्याची घटना सोमवारी(ता.१९) सकाळी ११:०० वाजता दरम्यान घडली. या वाहकास निलंबित करण्याची मागणी होत आहे. 
         मुरमाडी/तूप परिसरातील प्रवाशांची जाण्यायेण्याची सोय व्हावी. या करिता साकोली आगाराकडून भंडारा ते सानगडी आणि मुक्कामी पालांदुर बस चालविली जाते. सोमवारी सकाळी ११:०० वाजता दरम्यान बस क्रमांक एमएच ४० एन ८९४० ही बस सानगडी वरून भंडारा कडे जात असताना या बस मध्ये काही विद्यार्थिनी प्रवास करीत होत्या. तिघीही मैत्रिणी असल्यामुळे आपसात चर्चा करिता असताना वाहक त्यांना वारंवार चूप राहा चूप राहा असे ओरडून सांगत होता. पण वाहकास दाद न घालता त्या विद्यार्थिनी आपसात बोलतच राहिल्या. त्यामुळे बस वाहकाने त्यातील एका मुलीस टार्गेट करून नान्होरी बस थांब्यावर बस थांबवून तिला बस मधून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस मधील प्रवाशी संतप्त झाले व काही प्रवाशांची बस वाहकाबरोबर बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वाहकास निलंबित करण्यात यावे. अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे. या वाहकाने मागील पंधरावाड्यातही एका प्रवाशाशी असभ्य व्यवहार करून तो दिघोरी बस थांब्यावरून पिंपळगाव करिता बस मधून प्रवास करण्यासाठी बस मधे बसला असताना त्याला मुरमाडी/तूप ते पिंपळगाव चे तिकीट घेण्यास ह्या वाहकाने बाध्य केले होते. हे विशेष. या बाबद प्रतिक्रिया घेण्याकरिता आगार व्यवस्थापक शेंडे यांचेशी संपर्क साधला असता झाला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या