बालकांनी कवितेतून मिळविली वाहवा
कथा कथनाला रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा: वर्धा ग्रंथोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच बालकांसाठी स्वतंत्र काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. एकापेक्षा एक दर्जेदार कवितांचे सादरिकरण करत बालकांनी मोठ्यांची वाहवा मिळविली. स्थानिक बजाज वाचनालयात या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बाल कवींच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे, जेष्ठ कवयित्री जयश्री कोटगीरवार, किड्स फॉउंडेशनचे मनीष जगताप, शरद ढगे, स्वप्नील वैरागडे, सुधीर गवळी, दिलीप रोकडे, निवेदिका ज्योती भगत, लायन्स क्लब गांधी सिटीचे सचिव आशिष पोहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रंथालय संचालनालय व जिल्ह्य ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित वर्धा ग्रंथोत्सवात दुसऱ्या दिवशी बालकांचे काव्य संमेलन झाले. या प्रसंगी जिल्ह्यातील अनेक बालकवींनी त्यांची कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्रावणी राऊत, शौऱ्या कदम, सावेरी डाखोरे, चेतना पचारे, प्रणाली वाघमारे, रुद्रेश डेहणकर, मयुरी तिरकल, रश्मी गजभिये, हर्षिता उईके, समीक्षा टिपले, जान्हवी वाघधरे, देवयानी बोरसरे, मृणाल सावरकर, श्रावणी फुनसे, मृणाली भोयर, संस्कृती चिचाटे, ज्ञानदीपा कालोडे, कृष्णा धांदे या बालकवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करत रसिकांची वाहवा मिळविली.
या काव्य स्पर्धेचे संचालन बाल निवेदिका चाहत पेटकर हिने केले. या स्पर्धेचे संयोजन किड्स फॉऊंडेशनने केले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ.प्रीती तडस वाडिभस्मे व वृशाली मारतोडे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कथाकथन देखील घेण्यात आले. या कथाकथनाच्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रा.किशोर वानखेडे, अभिजीत डाखोरे, आशिष वरघणे, सुषमा पाखरे यांच्या कथानी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कथाकथन कार्यक्रमाचे संचालन संध्या सायंकार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व किड्स फॉउंडेशन च्या सदस्यांनी परीश्रम घेतले. बालकांचे काव्य वाचन व कथा कथनाच्या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या